दिंडीतून विद्यार्थ्यांनी दिला संस्कृती विचारधारांचा संदेश

1 min read

खेड दि.१५:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहणे (ता.खेड) येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची पंढरपूर पायी वारी सोहळा आयोजित करण्यात आला होता. वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि संस्कृती या विचारधारांचा संदेश या वारीतून विद्यार्थ्यांना देण्यात आला. वारकरी पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी अतिशय उत्साही दिसत होते. विद्यार्थ्यांच्या या दिंडीचे नियोजन डेहणे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री सातकर व उपशिक्षक दुलाजी तिटकारे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि संतांचे विचार याबाबत अधिक मार्गदर्शन मुख्याध्यापक जयश्री सातकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे, केंद्र प्रमुख भास्कर बुरसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे