पूजा बोरचटे व सुरेखा गुंजाळ यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार
1 min read
गुंजाळवाडी दि.८:- ग्रामपंचायत गुंजाळवाडी बेल्हे (ता.जुन्नर) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त पूजा बोरचटे व सुरेखा गुंजाळ यांचा गावातील कर्तबगार महिला म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच नयना रामदास गुंजाळ, उपसरपंच गोविंद गुंजाळ, ग्रा. पं.सदस्य दीपाली बोरचटे तसेच ग्रामस्थ दगडू गुंजाळ, मारुती दिघे, ज्ञानेश्वर दिघे, विठ्ठल गुंजाळ, अंजनाबाई बोरचटे, संगीता गुंजाळ, राबीरा पठाण, कुलसूम मुजावर, यमुनाबाई दिघे, रसिदा मुजावर, पल्लवी तांबे, कमाल वाघचौरे ग्रा. पं. कर्मचारी आदी उपस्थित होते.