सेवानिवृत्त सैनिक प्रवीण हाडवळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
1 min read
राजुरी दि.८:- राजुरी येथील प्रवीण गुलाब हाडवळे यांची सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्याने यांचा फुलागंगाचा मळ्यातील मित्रमंडळी व राजुरी ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार करण्यात आला. प्रवीण गुलाब हाडवळे यांनी वीस वर्षाची देश सेवा करून ते सेवानिवृत्त झाले. हाडवळे यांची १ नोव्हेंबर २००४ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती झाली व तळेगाव येथे प्रशिक्षण घेतले. त्रिपुरा येथे सब-इन्स्पेक्टर पदावर पदोन्नती, ३० नोव्हेंबर २०१४ इन्स्पेक्टर पदावर पदोन्नती झाली. त्रिपुरा, जम्मू, ओरिसा, राजस्थान, आसाम, पंजाब, जम्मू असा त्यांच्या देश सेवेचा प्रवास झाला.
३१ मे २०२५ जम्मू येथे इन्स्पेक्टर पदावरून सेवानिवृत्त झाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्यांचे रमाकांत हाडवळे यांनी केले. प्रवीण गुलाब हाडवळे यांचा सत्कार हभप दत्ता महाराज भोर संगमनेर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गावचे ग्राम नेते दिपक आवटी, सरपंच प्रिया हाडवळे,
उपसरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके, उद्योजक एम.डी घंगाळे, पप्पू हाडवळे, सुभाष पाटील आवटी, गोरख हाडवळे, पंकज कणसे, कॅप्टन हाडवळे, विघ्नहर्ता मंडळाचे अध्यक्ष रामदास सरोदे, स्वप्निल हाडवळे, सावळेराम हाडवळे, देवराम हाडवळे, संपत हाडवळे, विनायक हाडवळे, शिवाजी हाडवळे, गोविंद हाडवळे,
पांडुरंग हाडवळे, एकनाथ सरोदे, रईस पटेल, शिवाजी शिंदे, स्वप्निल बोडके, राहुल हाडवळे, किरण हाडवळे, रमेश पानसरे, जावेद पटेल महेश घंगाळे, हारुण पटेल आदी मान्यवर उपस्थित होते व सूत्रसंचालन जी.के औटी यांनी केले. या वेळी मोठ्या प्रमाणात महिला ही उपस्थित होत्या.