श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलचे विद्यार्थी विठू नामाच्या गजरात दंग 

1 min read

बेल्हे दि.१५:- विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व परंपरा यांची विद्यार्थी दशेपासूनच ओळख व्हावी यानिमित्ताने श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा (ता.जुन्नर) येथे सोमवार दि.१५ रोजी आषाढ़ महिन्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई यांची दिंडी काढण्यात आली.

विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थानीही दिंडीचा आनंद घेत श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच च्या चिमुकल्या मुलांनी डोक्यावर तुळशी घेतल्या होत्या. हातात टाळ, पताका व विना घेऊन माऊली माऊली चा जयघोष विद्यार्थी करत होते.

लहान चिमुकल्यांना वारकऱ्यांच्या वेशात पाहून सर्व ग्रामस्थ त्यांचं कौतुक करत होती. या दिंडी सोहळ्यानिमित्त सुरेश तिकोणे, सरपंच सविता तिकोणे, मुख्याध्यापक सुदाम जगताप, रमेश मालुंजकर, संतोष कर्डक, जयश्री थोरात, माया माळवे, विद्या औटी, सविता पवार, सबाजी गुंजाळ, विलास गुंजाळ,

लक्ष्मण गायकवाड आदि उपस्थित होते. रानमळा ग्रामस्थ सुनिल बबन गुंजाळ यांतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शेवटी विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाने दिंडीची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे