मॉडर्न च्या पायी दिंडीने वेधले बेल्हेकरांचे लक्ष

1 min read

आणे दि.१४ :- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बेल्हे गावामध्ये पर्यावरण पूरक दिंडीचे आयोजन केले होते. वारकरी वेशातीत या विद्यार्थांनी बेल्हेकरांचे लक्ष वेधले. १ ली ते १२ वी चे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले. होते. यामध्ये विठ्ठल – रुक्मीणी, संत जनाबाई, संत नामदेव,संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, अशा विविध संतांची वेशभूषा विद्यार्थांनी केली होती. पारंपरिक, विना, पखवाज या वादयांच्या नादात विदयार्थी माऊली- माऊली, विठोबा-रखुमाई म्हणत होते. गावातील ग्रामस्थांनी या दिंडीचे स्वागत केले. बेल्हे बसस्थानकावर कीर्तन, भजन, नृत्य व फुगडी झाली. शाळेतील तन्वी बोरचटे या विद्यार्थिनीने संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर कीर्तन सांगितले. तसेच च्या चिमुकल्या मुलांनी डोक्यावर तुळशी घेतल्या होत्या. हातात टाळ, पताका व विना घेऊन माऊली माऊली चा जयघोष विद्यार्थी करत होते. लहान चिमुकल्यांना वारकऱ्यांच्या वेशात पाहून सर्व ग्रामस्थ त्यांचं कौतुक करत होती. या दिंडीतून विद्यार्थांनी झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, प्लास्टिक पिशव्यां ऐवजी कापडी व कागदी पिशव्या वापरा, एकात्मता, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, इंधन बचत, स्वच्छता राखा, झाडे लावा पृथ्वी वाचवा. अशा विविध घोषणा देऊन समाजप्रबोधक केले. विद्यार्थांनी समाज प्रबोधन पर घोषणा दिल्या तसेच मेघराजला बरसून बळीराजाला सुखी करण्याचं आवाहन विद्यार्थ्यांनी केलं. विठ्ठलाची आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपल्यामुळे ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी, शाळेच्या जेष्ठ मार्गदर्शिका सुमन ढवळे, संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता. शाळेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे