डॉ. कदम गुरुकुल स्कूलमध्ये आनंदी मानसिक आरोग्य दिंडी सोहळा संपन्न

1 min read

इंदापूर दि.१४:- संजीवनी सोशल फाउंडेशन संचलित डॉ. कदम गुरुकुल मध्ये आनंदी मानसिक आरोग्य दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी हरिनामाचा गजर करीत गुरुकुलच्या बाल वैष्णवांनी विठ्ठल, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई. अशा विविध संतांच्या वेशभूषा आणि इतर सर्व विद्यार्थ्यांची वारकरी वेशभूषा ही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. यावेळी टाळ, मृदंग व तुळशी डोक्यावर घेऊन हरिनामाचा गजर करीत सर्व बाल वैष्णवांनी पालखी सभोवताली मोठ्या उत्साहात गोल रिंगण केले. मृदंगाच्या ठेक्यावर फुगडीचाही आनंद लुटला. नंतर आनंदी मानसिक आरोग्य या संकल्पनेवर पथनाट्याचे सुंदर सादरीकरण केले. त्यानंतर पालखी आणि दिंडी इंदापूर येथे रामवेस नाका येथून नेहरू चौक मार्गे नगर परिषद मैदानावर गेली. त्या ठिकाणी सामाजिक संदेश देत आनंदी मानसिक आरोग्य पथनाट्य सादर केले. हे पथनाट्य पाहण्यासाठी इंदापूर मधील अनेक नागरिकांनी गर्दी केली. सामाजिक संदेश यामुळे या विद्यार्थ्यांचे आभार इंदापूरकरांनी मानले.या पालखी सोहळ्याचे पूजन डॉ.कदम गुरुकुलच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, अनिता परारकर. उपप्राचार्य ऋषी बासू, स्कूल मॅनेजर संदीप जगताप, सचिव नंदकुमार यादव, पांडुरंग घाडगे, दिलीप बोधक, सचिन पांढरे, सचिन जाधव, योगेश शहाणे यांच्या हस्ते पूजन झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी मनोहर पेटकरआणि प्रणिती माने यांनी केले. तर आभार लालाजी शेंडे यांनी मानले. मृदंग साथ महेश झगडे यांनी तर अभंग आणि आरती मनोज पवळ मंगेश चंदनशिवे यांनी म्हटले या कार्यक्रमासाठी पालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे