कल्याण- नगर महामार्गावर कार व ट्रक चा भीषण अपघात; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

1 min read

बेल्हे दि.११:- राजुरी या ठिकाणी कार व मालवाहतुक ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात कार चालक ठार झाल्याची घटना गुरूवार दि.११ रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये सुरेश गोपाळ काळे रा.निघोज ता.पारनेर यांनी दिलेल्या. फिर्यादीनुसार त्यांचा भाचा स्वप्निल भगवान तोडकर (वय २४) रा.वडझिरे ता.पारनेर, जिल्हा. अहिल्यानगर हा त्याच्या ताब्यातील कार एम.एच.०१ ए.एल ४९०१ मध्ये त्याची पत्नी पौर्णीमा तोडकर हिच्या सह निघोज या ठिकाणी जात असताना. नगर -कल्याण या राष्ट्रिय महामार्गावरील गुंजाळवाडी गावच्या हद्दीत सह्याद्री महाविद्यालयाच्या जवळ समोरून आलेल्या ट्रक एन.एल.०१ ए.डी.४९५७ चा चालक राजकुमार शामलाल (रा. भैसिया ता. पट्टी, जिल्हा- प्रतापगड, उत्तरप्रदेश) याने निष्काळजी पणे व विरूध्द बाजुने येऊन कार ला जोराची धडक दिल्याने. कार चालक स्वप्निल तोडगर यांस गंभीर दुखापत होऊन मुत्यू झाला असुन त्याची पत्नी पौर्णिमा गंभीर जखमी झाली आहे. ट्रक चालकावर आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीष होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गोसावी करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे