ओतूर जवळ पारनेर- मुंबई एसटी बस व कारचा भीषण अपघात; दोन ठार, १५ ते २० जखमी
1 min read
ओतूर दि.७:- कल्याण- नगर महामार्गावरील ओतूर जवळील अण्णासाहेब कॉलेज जवळ एसटी बस व ब्रिझा कारचा अपघात झाला असून यामध्ये दोन ठार तर बस मधील पंधरा ते वीस प्रवाशी जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की रविवार दि.७ रोजी सकाळी पारनेर डेपोची पारनेर – मुंबई एसटी बस क्रमांक एम एच 14 बीटी 4280 व ब्रिझा कार एम एच 46 सीएम 2155 या दोन्हींचा समोरासमोर अपघात झाला.
अपघात एवढा भयानक होता की कारचा चक्काचूर झाला असून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस एका झाडावर जाऊन धडकली.
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण नगर महामार्गावरती अपघाताचे सत्र सुरूच असून वाहनधारकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. जखमी व मृतांची नावे अद्याप समजली नाहीत.