श्रीमती सिताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालयाचा ९० टक्के निकाल
1 min readबेल्हे दि.८:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न श्रीमती सिताबाई रंगुजी शिंदे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा मार्च-एप्रिल परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
त्यामध्ये कला शाखेत बटवाल निलेश निवृत्ती (80.30%), गाडगे सुषमा विष्णू (79.40), गवारी प्रगती निवृत्ती (78.90) तसेच वाणिज्य शाखेत काळे सुमित सुरेश (72.90), काळे सिद्धेश शरद (70.50), निसाळ श्रेयस तानाजी (69.90%)
व बोडके रोशन ज्ञानेश्वर (69.90%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष एस.आर शिंदे, सचिव विनायक शिंदे व खजिनदार राजीव शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या वतीने बी ए, बी कॉम तसेच एम.काॅम अभ्यासक्रम राबवले जातात नवीन शैक्षणिक वर्ष 2024- 25 साठी प्रवेश सुरू झाल्याचे प्राचार्य डॉ. गुंजाळ टी.डी यांनी सांगितले.