धाबेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

1 min read

खेड दि.११:- सायबेज सॉफ्टवेअर प्रा लि, या आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनीच्या सीएसआर अंतर्गत सायबेजआशा ट्रस्ट या संस्थेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबेवाडी ता. खेड येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

सायबेजआशा संस्था गेल्या ६ वर्षापासून गरजू, होतकरू आणि अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य आणि दप्तर वाटपाचा उपक्रम राबवत असते.

याही वर्षी संस्थेने खेड तालुक्यातील गावामधील जिल्हा परिषद शाळा धाबे वाडी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी दप्तर वाटप कार्यक्रम करण्यात आला. एकूण 12 विद्यार्थांना शालेय दप्तर साहित्यासह देण्यात आले.

या प्रसंगी सायबेजआशा संस्थेचे प्रतिनिधी, शाळेचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, पालक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे