रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी माध्यमातून बेल्हे जिल्हा परिषद शाळेला ई- लर्निंग संच प्राप्त
1 min read
बेल्हे दि.१२:- रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांजकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं-१ (ता.जुन्नर) शाळेला ई- लर्निंग संच प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे. या हेतूने बेल्हे गावचे सुपुत्र व रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी चे प्रोजेक्ट समन्वयक अण्णा मटाले यांच्या प्रयत्नातून हा ई लर्निंग संच शाळेला प्राप्त झाला. याप्रसंगी ई लर्निंग संच प्रदान कार्यक्रमांमध्ये रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे व दीपक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करत.
रोटरी क्लब चे कार्य समजावून सांगितले. शाळेतील विविध उपक्रमांचे तसेच भरीव लोकसहभागाचे कौतुक केले व आगामी काळात शाळेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी समवेत रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी चे संचालक, दत्तात्रय कोल्हे, गणेश काशीद.
पांडुरंग वाळुंज, निवृत्त कक्ष अधिकारी घोलप, आंतरराष्ट्रीय खेळाडू सार्थक मटाले, विजय गाडेकर, अण्णा भुजबळ, योगेश शहा इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.शाळेला ई लर्निंग संच दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुप्रिया बांगर, उपाध्यक्ष सोयल बेपारी मुख्याध्यापिका मीरा बेलकर.
सदस्य दादाभाऊ मुलमुले, वैशाली मटाले, विलास पिंगट यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान केला.सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना घोडके यांनी मनोगत व्यक्त करत देणगी दारांचे आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील उपशिक्षिका कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, प्रवीणा नाईकवाडी, योगिता जाधव, सुषमा गाडेकर,अंजना चौरे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक संतोष डुकरे यांनी केले व आभार हरिदास घोडे यांनी मानले.