रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी च्या वतीने चाळकवाडी येथील शाळेत डिजीटल संचाचे लोकार्पण
1 min read
आळेफाटा दि.१२:- रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी पुणे यांच्या माध्यमातून गुरुवार (दि.११) शिवांजली शैक्षणिक संकुलात डिजिटल स्क्रीनचे वितरण करण्यात आले. माहिती तंत्रज्ञानाच्या डिजीटल जगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अभ्यास प्रणालीसह हे संच रोटरी क्लबने उपलब्ध करून दिले आहेत. या शालेय विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक असणारा अभ्यासक्रम सहज शिकण्याची व पुढील पिढी सक्षम करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीने उचलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.
व यामाध्यमातून विद्यार्थ्यांची व शाळेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असे मत अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांनी मांडले.दिपप्रज्वलन, सरस्वतीपूजन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संस्थेच्या वतीने स्वागत अशोक कुऱ्हाडे यांनी तर प्रास्तविक रोटरी क्लबचे सचिव दिपक सोनवणे यांनी केले. आभार मुख्याध्यापक भानुदास चासकर यांनी मानले.यावेळी शिवांजली शैक्षणिक संकुलाचे संस्थापक इंजी.शिवाजी चाळक, संचालक भरत शिंदे, मुख्याध्यापक भानुदास चासकर.
रोटरी डायनॅमिक भोसरीचे संचालक आण्णासाहेब मटाले,पांडुरंग वाळुंज,बाळासाहेब कोते,दत्तात्रय कोल्हे, गणेश काशिद,निवृत्त कक्षाधिकारी दिलीप घोलप, आंतरराष्ट्रीय खेळाडू सार्थक मटाले यांच्यासह शिवांजली शैक्षणिक संकुलाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.