बेल्हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बीटस्तरिय शिक्षण परिषद चे अयोजन

1 min read

बेल्हे दि.३०:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेत आज बीटस्तरिय शिक्षण परिषद चे अयोजन कऱण्यात आले. पंचायत समिती जुन्नर च्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी उपस्थित राहून सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. बेल्हे , निमगाव सावा, अणे केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.

बेल्हे केंद्राचे केंद्र प्रमुख शौकत पटेल, अणे केंद्राच्या केंद्रप्रमुख रत्नप्रभा वाकचौरे यांनी चालू शैक्षणिक वर्षांत करावयाच्या विविध कामांची माहिती दिली. कार्यक्रमचे सूत्रसंचलन संतोष डुकरे यांनी केले. आभार अशोक बांगार यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे