जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आय ए एस अधिकारी आनंद भंडारी यांची भेट
1 min read
बेल्हे दि.२९:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर एक शाळेला बेल्हे (ता.जुन्नर) गावचे सुपुत्र शाळेचे माजी विदयार्थी ज्यांची नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी पदी निवड झाली याबद्दल त्यांचा सन्मान उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेंद्र पिंगट यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यांच्या समवेत उपस्थित डॉ. स्मिता भंडारी यांचा सन्मान शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करत भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मोबाईल पासून दूर राहून वाचनाकडे वळावे असा संदेश दिला.
पंचायत समिती जुन्नरच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तारअधिकारी विष्णू धोंडगे यांनी उपस्थित राहून दोघांचा पंचायत समिती जुन्नरच्या वतीने सन्मान केला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेअंतर्गत शाळेला मंजूर असलेल्या 84 लक्ष रुपयांच्या निधीमधून करावयाच्या कामाची सुरुवात याप्रसंगी करण्यात आली. यासाठी साहेबांचं मोलाच मार्गदर्शन लाभले. शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने यापुढील काळात शाळेला लागणाऱ्या भौतिक गरजा पूर्ण करण्याबाबत कटिबद्ध असल्याचे साहेबांनी सांगितले. तसेच शाळेत सुरू असलेल्या मिशन बर्थडे स्पोकन इंग्रजी, विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन ,क्रीडा स्पर्धांमधील यश, इत्यादी उपक्रमांची माहिती उपशिक्षक संतोष डुकरे यांनी या प्रसंगी दिली.
याप्रसंगी सरपंच मनिषा डावखर, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भंडारी, मंदाकिनी नायकोडी, कमल घोडे, नाजिम (पापा) बेपारी, समीर गायकवाड, योगिता बांगर, शारदा बांगर, दिपाली मटाले, किरण गुंजाळ माजी सरपंच महेश बांगर ,मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जानकु डावखर, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भंडारी.
किशोर अभंग शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोहेल बेपारी, सदस्य दादाभाऊ मुलमुले, डॉ.विजय देशपांडे, रंगनाथ भांबेरे, अशोक बांगर, सविता कुऱ्हाडे व पालक,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नारायण पवार यांजकडून मुलांसाठी गोड मेनू म्हणून लाडू चे वाटप करण्यात आले.
तसेच शाळेतील उपशिक्षिका कविता सहाणे,सुवर्णा गाढवे प्रवीणा नाईकवाडी,योगिता जाधव ,सुषमा गाडेकर अंजना चौरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. उपशिक्षक हरिदास घोडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.