वनविभागाकडून विद्यार्थांना बिबट जनजागृती कार्यक्रम
1 min readबेल्हे दि.२९:- वनपरिक्षेत अधिकारी ओतूर व्ही.एम.काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगदवाडी कांदळी (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल येथे बिबट जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. डॉक्टर महेंद्र ढोरे यांनी शाळेतील मुलांना बिबट्याची वैशिष्ट्ये व बिबट्या बद्दल असणारा गैरसमज तसेच बिबट्या व त्याच्या सवयी याबद्दल माहिती दिली. तसेच वनपाल बी. एस. शिंदे यांनी शाळेतील लहान मुलांना बिबट्याने या पाठीमागे केलेले हल्ले परत होऊ नये त्यासाठी विशेष काळजी घेण्यास सांगितले. तसेच जुन्नर तालुक्यात जास्त प्रमाणात ऊसाची शेती तसेच पाण्याचा भाग असल्यामुळे लहान मुले व बाहेरील राज्यातून येणारे कामगार वर्ग तसेच शेतकरी यांनी विशेष काळजी घ्यावी रात्रीचे एकट्याने फिरू नये, शाळेतील मुलांनी घरी जाताना ग्रुपमध्ये जावे किंवा आवाज करत जावे, शेतात काम करत असताना. मोबाईलवर गाणे वाजवावी व हातात काठी ठेवावी अशा सूचना दिल्या व प्रोजेक्टर वरती शाळेतील मुलांना बिबट व मानव सहजीवन याबाबत व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सखाराम शेंडकर, दीपक गाडगे, पंडित चौघुले, निलेश शेलार, विद्या वाघ, आशा आरेकर, उज्वला कांबळे व इतर शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर माणिकडोह येथील डॉक्टर महेंद्र ढोरे व टीम तसेच वनविभाग वनपाल बी. एस. शिंदे, वनरक्षक व्हि. आर. गुंड नगदवाडी बिबट कृती दल रेस्क्यू मेंबर ऋषी गायकवाड, सोमनाथ भालेराव, बबन निकम इत्यादी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
“ओतूर वनपरिक्षेत्रातील ३६ बिबट प्रवण गावामधे वनकर्मचारी व रेस्क्यू सदस्यामार्फत गस्त घालण्यात येत असून येथील शाळा व महाविद्यालयात वनकर्मचारी जाऊन बिबट वन्यप्राणी बाबत जनजागृती करुन दक्षता घेण्याचे आवाहन करत आहेत.”
व्ही एम काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर.