विशाल जुन्नर फार्मसी महाविदयालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा
1 min read
आळेफाटा दि.२९:- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या डि. फार्मसी “वार्षिक परिक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहिर झाला आसुन यामध्ये विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलीत इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी व इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी फॉर वुमन महाविदयालयानी या वर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चा निकाल ८६.४८% आसून प्रथम वर्षा मध्ये हुले पायल ८१.७% प्रथम क्रमांक, कुटे तेजस ७८.३% द्वितीय क्रमांक तर मोमीन अदनान ७८.१% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. द्वितीय वर्षा चा निकाल ८४.४४% आसून द्वितीय वर्षामध्ये प्रसाद अविनाश ९१.०९% प्रथम क्रमांक, संजना गौतम ८७.२७% द्वितीय क्रमांक तसेच वामन प्रतिक्षा ८६.४६% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी फॉर वुमन चा निकाल ८१.४८% इतका लागला आसून प्रथम वर्षा मध्ये खान हुजेफा ८०.८% प्रथम क्रमांक, बाणाखेले सृष्टी ७८.४% द्वितीय क्रमांक तर महाडीक अदिती ७६.३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. द्वितीय वर्षा चा निकाल ९०.००% आसून द्वितीय वर्षामध्ये मध्ये अंसारी सानिया ८९.४६% प्रथम क्रमांक, भोर स्नेहा ८३.७३% द्वितीय क्रमांक तसेच बढे सई ८२.९१% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व गुणवंत तसेच सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अकुश सोनवणे, व विश्वस्त मंडळ, सी.ई.ओ. डॉ.डी.डी. गायकवाड, महाविदयलयाच्या प्राचार्य डॉ. हांडे आर.ए. आणि प्राचार्य जाधव ए.एस., सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विदयार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.