विशाल जुन्नर महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी एम. टेक पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेत झळकले

1 min read

आळे दि.२८:- विशाल इंस्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एजुकेशन एंड रिसर्च महाविद्यालयातील आळे (ता.जुन्नर) येथील तीन विद्यार्थी NIPER द्वारे एम. टेक या पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले.

देशातील औषधनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य व प्रतिष्ठित असलेली “राष्ट्रीय फार्मस्युटिकल शिक्षण व संशोधन” (NIPER) शैक्षणिक संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करून एम. टेक. या पदवी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी स्वप्नील गावडे (AIR 360 in M-tech & 1136 in MS), श्रेया भुजबळ (AIR 413), आरती भदले (AIR 2133 यांची निवड झाली असून

संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, व विश्वस्त मंडळ, सीईओ डॉ. दुष्यंत गायकवाड, प्राचार्य डॉ. सुरेश जाधव यांनी या विद्यार्थांचे अभिनंदन केले. तसेच या विद्यार्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे