शिरूरला महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
1 min read
शिरूर दि.२६:- : शिरूर शहरात एका महिलेचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत कविता सुनील भोसले (वय ४९, रा. जोशीवाडी शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील काचे आळी येथे २१ जून रोजी शशिकला गादिया या महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.