समर्थ आयुर्वेद कॉलेज कडून विद्यार्थांची मोफत आरोग्य तपासणी

1 min read

रानमळा दि.२१:- शाळा महाविद्यालयाचे नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 शनिवार 15 जून रोजी सुरु झाले असून या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा (ता.जुन्नर) या ठिकाणी इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

समर्थ आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल, बेल्हे यांच्या वतीने डॉ. रमेश पाडेकर, डॉ. तोरणे, सुलताना पटेल, अक्षय भाईक यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करुन त्यांना योग्य मार्गदर्शन व औषधे दिली.या प्रसंगी रानमळा गावच्या लोकनियुक्त सरपंच सविता तिकोणे तसेच रानमळा ग्रामस्थ व विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम जगताप, कॉलेजचे ओ.एस यशवंत फापाळे आदी उपस्थित होते. या वेळी शाळेच्या वतीने कॉलेजचे आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे