गुंजाळवाडील बालचमूंचे सजवलेल्या बैलगाडीतून जंगी स्वागत

1 min read

गुंजाळवाडी दि.२०:- शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.२ चे औचित्य साधत कल्पक शिक्षक व उत्साही ग्रामस्थ यांच्या संवादातून गुंजाळवाडी शाळेत नव्यानेच दाखल झालेल्या बालचमूंना पानाफुलांनी सजवलेल्या बैलगाडीत बसवून. गावातून ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून गावात, शाळेत भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फुगे, टोप्या, रांगोळी, फलकलेखन यांनी कार्यक्रमात अधिकच रंग भरले. यानिमित्ताने नवागत मुलांचे औक्षण, अध्ययन क्षमतांचा पडताळा. मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ तसेच कृतीपत्रिकांचे वाटप, पालकांचे उद्बोधन, पालक मेळावा, SMC समिती मिटींग इ.कार्यक्रम संपन्न झाले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन/नियोजन मुख्या. पाटीलबुवा खामकर व तुकाराम खोडदे यांनी केले. ग्रामस्थांच्या दातृत्वातून संपन्न शाळा निर्माण झाल्याने शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाची कास धरत शाळेचा गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकांनी शाळेप्रती सद्भावना व्यक्त करत इंग्रजी व मराठी माध्यमातील मुले शाळेत दाखल केल्याने ग्रामस्थांनी शिक्षकांचे कौतुक केले. बाबुराव बोरचटे यांनी बैलगाडीचे सहाय्य केले. सारथ्य रामचंद्र गुंजाळ यांनी केले. सरपंच नयना गुंजाळ यांनी कार्यकमास शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यास शिक्षणा फाऊंडेशनच्या स्वाती शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी उपसरपंच संगिता बोरचटे, ग्रा.पं.सदस्या दिपाली बोरचटे. गोरक्ष गुंजाळ, शाळा समिती अध्यक्ष सतिश बोरचटे, उपाध्यक्ष मारुती बोरचटे, सदस्य रमेश गुंजाळ, सचिन गुंजाळ, जयसिंग पवार, राजू बोरचटे, दिनकर गुंजाळ, बारकू बोरचटे, दिनकर औटी, गोविंद बोरचटे, तंटामुक्ती अध्यक्ष बबन गुंजाळ, ह.भ.प.काशिनाथ बोरचटे, आसिफ मुजावर. शारदा बोरचटे, अनिता बोरचटे, रंजना बोरचटे तसेचे मोठया संख्येने माहिलावर्ग, शिक्षणप्रेमीनागरिक, शुभम गुंजाळ व तरुण वर्ग इ.उपस्थित होते. दादाभाऊ कसबे व दत्तात्रय कसबे यांनी ढोल ताशांतून वातावरण निर्मिती करत बैलगाडीतील चिमुकल्यांकडे अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अनेकांना ही क्षणचित्रे कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरता आला नाही. या उपक्रमासाठी शिक्षणप्रेमी नागरिकांनी खूप साऱ्या शुभेच्छा व सदिच्छा दिल्या. शेवटी उपस्थितांना चहापान व नाष्टा वाटप करुन कार्यक्रमाची हसत खेळत सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे