सिंहगड कॉलेजने जिंकली सोलार इलेक्ट्रिक व्हेईकल चॅम्पियनशिप
1 min readवडगाव (बु.) दि.२०:- सोलार इलेक्ट्रिक व्हेईकल चॅम्पियनशिप सीजन 7.0 चे आयोजन मणिपाल यूनिवर्सिटी, उडूपी, कर्नाटक या ठिकाणी २७ मार्च २०२४ ते १ एप्रिल २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर चॅम्पियनशिप मध्ये संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठातून १९ टीम सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव (बु.), पुणे ची टीम हायपेरियन सहभागी झाली असल्याची माहिती प्रा.तुषार काफरे व प्रा.एम एन नामेवार यांनी दिली.
महाविद्यालयामध्ये सदर टीम २०१६ पासून कार्यरत असून विद्यार्थ्यांनी या अंतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकल तयार केले आहे. व विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. या चॅम्पियनशिपमध्ये टीम हायपेरियन ही ओव्हर ऑल नॅशनल चॅम्पियन विजेती ठरली व वेगवेगळ्या टेस्ट जसे डायनामिक चॅम्पियन, स्टॅटिक चॅम्पियन, बेस्ट डिझाईन, एच. ओ. एच. टेस्ट, बेस्ट एंड्यूरन्स यामध्ये बक्षीस मिळवले.या टीम मध्ये कॅप्टन (निखिल बंगाल), मॅनेजर (नचिकेत मेहर), इलेक्ट्रिक हेड (गुरुप्रसाद फुलवाले), मेकॅनिकल हेड (ददुर्वेश चौधरी), ट्रान्समिशन हेड (आदित्य तलमाले) आणि २० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डॉ. धनंजय कंकाळ, डॉ. ए. बी. कणसे पाटील. प्रो. एस. बी. धोत्रे, प्रो. आर. यु. शेकोकर, प्रो. एम. एन. नामेवार व प्रो. ए. पी. लुक्कड यांनी केले. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वडगाव (बु.) पुणे चे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे, उप प्राचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. ए. पी. पांढरे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी यांनी सदर टीमचे मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.