समर्थ ज्युनिअर कॉलेज च्या कशब मोमीन एमएचटी-सीईटी ला ९८.९७, तर सृष्टी भाकरे ला जेईई मेन मध्ये ८१.१४ पर्सेंटाईल
1 min read
बेल्हे दि.१९:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) येथील विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी व जेईई परीक्षेत घवघवीत यश मिळविले असल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.कशब मोमीन या विद्यार्थिनीने एमएचटी-सीईटी २०२४ मध्ये ९८.९७ पर्सेंटाइल मिळविले.
तसेच सृष्टी भाकरे हिने जेईई मेन मध्ये ८१.१४ पर्सेंटाईल मिळवून यश संपादन केले.गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे क्लासेस माफक दरात उपलब्ध करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल नेहमीच अग्रेसर असते.इयत्ता ११ वी पासून दोन वर्ष एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करून घेतली जाते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे समर्थ ज्युनिअरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या सीईटी व जेईई परीक्षेमध्ये लक्षणीय यश मिळवले आहे.एका सर्वसामान्य कुटुंबातील मोमीन कशब हिने यश संपादन केले आहे.
त्याचबरोबर आर्यन उदागे-९८.५० (पीसीबी),सानिका घोलप-९७.३२ (पीसीबी),साक्षी गुंजाळ-९५.६८ (पीसीबी),८३.४२ (पीसीएम),वैष्णवी लामखडे ९५.१७ (पीसीबी),श्रीकृष्ण शिंदे-९४.१७ (पीसीबी),८४.६० (पीसीएम),वेदिका घाडगे-९३.०८ (पीसीबी),महेक कुरेशी -९१.२१ (पीसीबी),ईश्वरी फापाळे-८७.५१ (पीसीबी),वेदांत कोरडे-८७.५१ (पीसीबी).
कशब मोमीन-८६.५२ (पीसीएम),प्रतिक्षा कुरधने-८६.४४ (पीसीबी),सृष्टी भाकरे ८४.१९ (पीसीएम),प्रणव कणसे ८३.९८ (पीसीबी),वैष्णवी चौधरी-८३.६३ (पीसीबी),सेजल माने-८२.३७ (पीसीबी),साक्षी पाबळे-८१.५९ (पीसीबी) या विद्यार्थीनी घवघवीत असे यश संपादन केले.
नम्रता जोरी-८७.२९ (पीसीएम),प्रगती आंधळे-८४.५९ (पीसीएम),अविष्कार माळवदकर-८४.०२ (पीसीएम), वर्षा लामखडे-८१.०० (पीसीएम),शुभम माळवदकर -८०.०० (पीसीएम) या विद्यार्थीनी घवघवीत असे यश संपादन केले.सदर विद्यार्थ्यांना प्रा.संतोष पोटे,प्रा.राजेंद्र नवले,प्रा.विनोद चौधरी,प्रा.अमोल खामकर,प्रा.रोहिणी औटी,प्रा.नूतन पोखरकर.
प्रा.सोनल बांगर,प्रा.वंदना गोरडे,प्रा.दिपाली भोर, प्रा.वैशाली ढाकोळ यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच सर्व विभागाचे प्राचार्य विभागप्रमुख,शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.