विद्यानिकेतन च्या विद्यार्थांनी बनवले १००० सीडबॉल
1 min readसाकोरी दि.१९:- साकोरी (ता.जुन्नर) येथील सिडबॉल बनविणे या उपक्रमात विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १००० सिडबॉल बनवले. या मध्ये चिकू, सीताफळ, आंबा, जांभूळ अशा विविध बियांचा वापर केला. या उपक्रमात इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात सिडबॉल कसे तयार करायचे? त्यांचा उपयोग काय? त्यासाठी कोणकोणत्या बिया वापरायच्या? त्याचा वापर कसा करायचा? सिडबॉल तयार करताना विद्यार्थ्यांच्या अशा विविध शंकांचे निरसन शिक्षकांनी केले. शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन ही सीडबॉल ची चळवळ पुढे नेण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी हा स्त्युत्य उपक्रम हाती घेतला आहे. गावपातळीवरील सर्व घटकांनी मिळून तो पुढे नेल्यास हिरवीगार वनराई पुढील काळात निर्माण होईल व भविष्यात दुष्काळ मुक्तीसाठी निश्चितपणे प्रयत्न होईल.असे मत संस्थापक पांडुरंग साळवे यांनी व्यक्त केले.
या वेळी संस्थापक/अध्यक्ष पी.एम साळवे, पी.एम हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य रमेश शेवाळे, विद्यानिकेतन अकॅडमीच्या प्राचार्या रूपाली पवार (भालेराव), शिक्षक औटी संगीता, हाडवळे अनिता, अहिरे प्रवीण, भोर पुष्पांजली, भूर नूतन, गाडगे प्रतिभा, विशाल जाधव, पोळ अपेक्षा, वाजे प्रतिभा, विनोद उघडे आदी शिक्षकांनी उपस्थित होते.असे नेहमी नव नवीन उपक्रम विद्यानिकेतन संकुल करत असून अशा उपक्रमांत विद्यार्थी अग्रेसर असतात. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक नेहमीच कार्यरत असतात.