तेली समाज युवा उत्कर्ष मंडळा तर्फे जेष्ठ नागरिक सत्कार व विद्यार्थी गुण गौरव मोठ्या उत्साहात संपन्न
1 min read
अंबरनाथ दि.१८:- अंबरनाथ (पश्चिम) येथील मोरिवली गावात तेली समाज युवा उत्कर्ष मंडळा तर्फे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही रविवारी दिनांक १६ रोजी सायंकाळी ५ वा, ठिकाण: मोरिवली गावात तेली समाज हॉल येथे जेष्ठ नागरिक सत्कार व विद्यार्थी गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मोरिवली गावाचे समाजसेवक संजय दत्तात्रेय मगर व रेखा संजय मगर या दोघांच्या हस्ते चार मुलांना रोख पारितोषिक देण्यात आले.
सर्व तेली समाज बांधव व जेष्ठ नागरिक सत्कार व विद्यार्थी गुण गौरव सोहळा च्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप सुरेश झगडे यांच्या हस्ते पार पाडले.