धावत्या पुष्पक एक्सप्रेसमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू
1 min read
मुंबई दि.९:- मुंबईमध्ये आज सोमवारी सकाळी एका अपघातामध्ये अनेक प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ही विचित्र घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पक एक्सप्रेस’मधून 10 ते 12 प्रवासी खाली पडले आहेत. यापैकी पाच प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रवासी दाराजवळ उभे राहून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक ही घटना घडली.
मुंबईहून लखनऊच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसखाली हे प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.दरम्यान जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तर मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हे प्रवासी 30-35 वयोगटातील असल्याचंही समजतंय. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.