जुन्नरमध्ये बुलेटराजांचे सायलन्सर जप्त; ३ लाख ३७ हजारांचा दंड वसूल

1 min read

जुन्नर दि.१५:- जुन्नर शहरात गेल्या महिन्याभरात ट्रिपल सीट, नंबरप्लेट नसणे, वाहन परवानाजवळ नसणे,फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा, सीट बेल्ट न लावणे अशा नियमांचा भंग करणार्या ३८४ बेशिस्त वाहन चालकांवर ३ लाख ३७ हजार रुपये दंड रकमेची कारवाई जुन्नर वाहतूक पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे.

शहरात महागड्या बुलेटच्या सायलान्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे मोठ्या आवाजाचे सायलान्सर बसवून दिवसरात्र वेगाने अशा बुलेट चालविण्यार्यांविरोधात जुन्नर वाहतूक पोलीस विभाग अॅक्शन मोडवर आलेला असून गेल्या तीन-चार दिवसांत अशा अनेक बुलेटवर नियमानुसार दंडाची आणि बदल केलेल्या सायलान्सर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या पद्धतीची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून आले. स्पष्ट करण्यात पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलीस अंमलदार दीपक वनवे, विकास कारखिले, ट्राफिक वॉर्डन बाळकृष्ण खंडागळे, मोहन गायकवाड यांच्या पथकाने जुन्नरमधील पाच रस्ता चौक, बस स्थानक परिसर. नेहरू बाजार, धान्य बाजार आदी भागातील रस्त्यांवरून वेगाने धावणार्या अशा बुलेट गाड्यांवर नियमानुसार दंड रकमेची कारवाई केली. शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापा-यांची मोठा आवाज करीत वेगाने जाणार्या अशा बुलेट गाड्यांबाबत अनेक तक्रारी होत्या त्याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या होत असलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. दरम्यान, जुन्नर परिसरात वेडीवाकड्या पद्धतीने जाणार्या दुचाकीचालकांना थांबवून त्यांची ब्रेथ अनालायझेर मशीनच्या सहाय्याने तपासणी करून आलेल्या अहवालानंतर चिंचोली काशीद, आर्वी पिंपळगाव, ब्राह्मण बुधवार पेठ, धान्य बाजार पेठ, कर्जत अहमदनगर येथील चालकांविरोधात मोटार वाहन कायदा कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे