भाडेकरूंची माहिती आळेफाटा पोलिसांना सात दिवसांत दया अन्यथा कारवाईला सामोरे जा:- पोलिस निरीक्षक सतीश होडगर
1 min readआळेफाटा दि.११:- आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दी मधील भाडेकरूंची संपुर्ण माहिती संबधित घर मालकांनी पोलीस स्टेशनला देण्यात यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सतीष होडगर यांनी केले आहे. आळेफाटा पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजीत केलेल्या पत्रकारांना माहीती देताना सांगीतले. की पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये तसे ज्या ज्या ठिकाणी औदयोगीक वसाहती व फार्म हाऊस आहेत त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर परप्रांतीय अगर इतर भागातील नागरीक नोकरी व्यवसाय व इतर कामाच्या निमीत्ताने येवून भाडयाने घरे/दुकाने // फ्लॅट तसेच फार्म हाऊस घेवून राहात आहे. परंतू या बाबतची माहीती आळेफाटा पोलीस स्टेशला देण्यात येत नसुन दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभुमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी घर भाडयाने देताना / दुकान भाडयाने देताना भाडेकरूची संपुर्ण माहीती घेवून.
ती पोलीस स्टेशला देणे आवश्यक असुन ग्रामपंचायत इत्यादी हद्दीत राहणारे मालमत्ताधारकांनी त्यांचेकडील घरे / दुकाने / फ्लॅट तसेच फार्म हाऊस प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष भाडेतत्वावर देणे, पोट भाडेकरू ठेवणे किंवा घर दुकाने यांची विक्री केल्यास विकत घेणाऱ्याची. भाडेकरूची माहीती स्थानिक पोलीस ठाण्यास ७ दिवसाचे आत कळविणेबाबत प्रतिबंध आदेश पारीत करण्यात आलेला आहे.तसेच घरमालकांनी त्यांचे घरात / दुकानात भाडेकरू ठेवताना भाडेकरूची संपुर्ण नाव, सध्याचा पत्ता, दोन फोटो, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा (रजिस्ट भाडेकरार). ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करून आळेफाटा पोलीस स्टेशनला सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सदर आदेशान्वये भाडेकरूची माहीती ०७ दिवसात आळेफाटा पोलीस स्टेशला न दिलेस संबधीत घरमालक / दुकान मालक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच रात्रीच्या प्रहारी ज्या ठिकाणी बेकायदेशीर पणे ड्रोन फिरवताना दिसल्यास तात्काळ पोलीसांची संपर्क साधावा असे सांगीतले.