जुन्नर तालुका कृषी पर्यवेक्षक ACB च्या जाळ्यात; ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी ४००० रुपये लाच रंगेहाथ पकडले

1 min read

जुन्नर दि.६:- कृषी अधिकारी कार्य़ालय, जुन्नर येथील कृषी पर्यवेक्षक याला पुणे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये मंजूर

झालेल्या ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (दि.6) जुन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आली. बापु एकनाथ रोकडे (वय-५७) असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे.याबाबत तालुक्यातील ५२ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांना लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये ट्रॅक्टर मंजूर झाला होता. हे शासकीय अनुदान मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता तक्रारदार यांनी केली आहे. ट्रॅक्टरचे मंजूर अनुदान मिळण्यासाठी तक्रारदार हे कृषी अधिकारी बापु रोडके यांना भेटले. त्यावेळी रोकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कडे तक्रार केली.एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता कृषी पर्यवेक्षक बापु रोकडे याने तक्रारदार यांच्याकडे ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली. तसेच तडजोडी अंती चार हजार रुपये लाच मागून स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये लाच स्वीकारताना बापु रोकडे याला रंगेहाथ पकडले. आरोपीवर जुन्नर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे