भाडेकरूची माहिती न दिल्याने घरमालकावर गुन्हा दाखल
1 min read
नारायणगाव दि .३:- घर मालकाने भाडेकरूची पोलीस स्टेशनला माहिती दिली नसल्याने पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय ढेंबरे यांच्या फिर्यादीवरून घरमालक गणेश खंडू डोके (वय ४२ वर्ष रा. अभंग वस्ती वारुळवाडी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घरमालक गणेश डोके यांनी मागील दोन वर्षापासून स्वतःच्या मालकीच्या पाच खोल्यांमध्ये भाडेतत्त्वावर भाडेकरू ठेवले आहेत.नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पंधरा दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील घरमालकांनी आपल्या घरामध्ये भाडेकरू ठेवलेले असल्यास.
त्यांचा करारनामा व भाडेकरू संबंधीची सविस्तर माहिती पोलीस स्टेशनला देण्याचे आवाहन केले होते. घरमालक गणेश डोके यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला करारनामा व भाडेकरूंची सविस्तर माहिती दिलेली नसल्याने त्यांच्यावर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांचेकडील आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एन. लोखंडे करीत आहेत.