गहाळ झालेले ३ लाख ५२ हजार रुपयांचे फोन

1 min read

पाचगणी दि.२:- सातारा येथील पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे मोबाईल फोन मिसिंग/गहाळ होणेचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने मा. वरीष्ठांनी मिसिंग/गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. मा वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस अंमलदार यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात मिसिंग/गहाळ मोबाईलचा तपास हाती घेतला होता.पांचगणी पोलीस ठाणे दाखल मिसिंग/गहाळ मधिल मोबाईल फोनचे बुद्धी कौशल्याने व तांत्रीक माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील. परीसर व आजुबाजुचे पोलीस ठाणे हद्दीतील गावातुन तसेच इतर जिल्यातुन शोध घेवुन एकुण ३,५२,०००/- रुपये किमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकुण २२ मोबाईल फोनचा शोध घेवुन ते प्राप्त करण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले असुन नमुद फोन नागरीकांना परत करणेत आलेले आहेत.

सदर कामगीरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा व उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक. दिलीप पवार व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक/९६२ तानाजी रतन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल/७६२ उमेश रामचंद्र लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल/७०० अमोल धर्मु जगताप यांनी सहभाग घेतला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे