म्हशींची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर ओतूर पोलिसांची कारवाई; ७१ म्हशींची ची सुटका; ७ जणांवर गुन्हा दाखल; ६० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त 

1 min read

ओतूर दि.१६:- ओतूर (ता.जुन्नर) पोलीस स्टेशन हद्दित मौजे खुबी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे नाकाबंदी वाहन तपासणी दरम्यान एकुण ५ ट्रक चे पाठीमागील हौ‌द्यामध्ये लहान-मोठे असे एकुण ७३ म्हैस जनावरे त्यांना वेदना होईल अशा परिस्थीतीत दाटीवाटीने चारा-पाण्याची व्यवस्था न करता, रस्सीच्या सा‌ह्याने कुरतेने जखडुन बांधुन, जनावरांचे वाहतुकीचा परवाना नसताना, वैद्यकीय अधिकारी यांचे

स्वास्थ्य प्रमाणपत्र नसताना तसेच जनावरांना इयर टॅगिंग केले नसताना बकरी ईदचे अनुशंगाने मुंबई येथे कत्तलीसाठी विकणेसाठी वाहतुक करून घेवुन जात असताना मिळुन आले. त्यापैकी २ म्हैस जनावरे ट्रकमध्ये मयत अवस्थेत मिळुन आले.

त्याप्रमाणे मिळुन आले व जिवंत असलेले एकुण ७१ म्हैस जनावरे यांना चारा-पाणी याची देखभालीसाठी जिवदया मंडळ गोशाळा, संगमनेर, जि. अहमदनगर येथे जमा करणेत आले आहे. सदर कारवाई मध्ये एकुण ५ ट्रक, ७१ जिवंत लहान-मोठे म्हैस जनावरे व २ मयत म्हैस जनावरे असा एकुण ६०,४०,०००/-रू. चा मुद्देमाल मिळुन आला असुन

आरोपी नामे १) मोहम्मद वकील इकरार खान, वय ६४ वर्षे, रा. अमरपुर, ता. सियाना, जि. बुलंदशहर, राज्य उत्तरप्रदेश, २) तोहीत वाहीद कुरेशी, वय ४५ वर्षे, रा. शिवाजीनगर मुंबई, ३) उस्मानखान रमजानखान, वय ६० वर्षे, रा. गोवंडी, मुंबई, ४) रशीद अब्दुल रहीम शेख, वय ३२ वर्षे, रा. गोवंडी, मुंबई, ५) फिरोज सोहराब मलीक, वय ४३ वर्षे, रा. ब्रहाना भुगरासी, ता. सियाना, जि. बुलंदशहर, राज्य उत्तरप्रदेश,

६) फारूक कुरेशी, रा. फलटन, ता. फलटन, जि. सातारा व ७) मोहम्मद बिलाल भाईमिया शेख, रा. शिवाजीनगर कुर्ला, मुंबई यांचे विरूद्ध ओतुर पोलीस ठाणेस गु.र.नं. २४६/२०२४, प्राण्यांचा छळ अधिनियम १९६० चे कलम ११(१)(d)(e) (f)(h) (i), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारीत अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रवींद्र चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. लहु थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजीत पाटील, अनिल केरूरकर, पो.कॉ. ज्योतीराम पवार ब.नं.५२०, पो.कॉ. सुभाष केदारी ब.नं. १७३४,

पो.कॉ. शामसुंदर जायभाये ब.नं. २८३८, पो. कॉ. विश्वास केदार ब.नं. १७३४, पो.हवा. धनंजय पालवे ब.नं. २२८, पो.ना. भरत सुर्यवंशी ब.नं. २५८३, पो. हवा. महेश पटारे ब.नं. १८४७, सहा. फौज. महेशकुमार झणकर, पो. हवा. दिनेश साबळे ब.नं.२२५१, पो.हवा. शंकर कोबल ब.नं. २०७१, पो.हवा. सुरेश गॅगजे ब.नं. २३१४, पो. हवा. बाळशीराम भवारी ब. नं.९१६,

पो. हवा. नामदेव बांबळे ब.नं. २२१५, पो. हवा. विलास कोंढावळे ब.नं. २२५४, पो.ना. नदीम तडवी ब.नं. २५७१, पो.ना. संदिप लांडे ब.नं. २४९६, पो.कॉ. रोहीत बोंबले ब.नं.१११३, पो.कॉ. मनोजकुमार राठोड ब.नं. १११७, पो.कॉ. किशोर बर्डे ब.नं.३३३७, पो.कॉ. आशीष जगताप ब.नं. ३५८, पो.कॉ. विशाल गोडसे ब.नं. १७५७, पो.कॉ.

अंबुदास काळे ब.नं. १६५३, पो. कॉ. राजेंद्र बनकर ब.नं. २७२३, म.पो.हवा. भारती भवारी ब.नं. १८०, म.पो.कॉ. सिमा काळे ब.नं. २८७३, पोलीस मित्र शंकर अहिनवे असे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे