निमगाव सावात स्वर्गीय मगन गाडगे यांस अभिवादन

1 min read

निमगाव सावा दि.२९:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये स्वर्गीय मगन गाडगे यांच्या ६ व्या पुण्यस्मरणनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे माजी सचिव गणपत घोडे आणि माजी सरपंच इब्राहिम पटेल यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ब्रम्हवृंद श्रीकांत आंबेकर यांनी मंत्रोच्चारात पुष्पांजली अर्पण करून प्रतिमा पूजन केल. यावेळी आदरांजली व्यक्त करताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी स्वर्गीय मगन गाडगे यांच्या बाबतच्या आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय आप्पांच्या समवेतच्या आठवणींना उजाळा दिला. एक उत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व, समाजकारणी, मार्गदर्शक, धाडसी, निर्णयक्षम, निमगाव सावा गावचं भूषण असं हे जनतेला हवहवसं असणार व्यक्तिमत्व म्हणजे मगन गाडगे. त्यांच्यासोबतच्या जडणघडणीतूनच आणि योग्य मार्गदर्शनातून आम्ही घडलो असे मत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव पपरेश घोडे, संभाजी चव्हाण, सरपंच किशोर घोडे , संचालक दत्तात्रय घोडे गुरुजी,सोपान गाडगे, मा. उपसरपंच नजीर चौगुले, भालचंद्र उनवणे, संजय उनवणे. मा.सरपंच रोहिदास खाडे, डॉ. ज्ञानदेव गाडगे, संतोष गाडगे, बाळासाहेब थोरात, मुरलीधर काटे, रुपेश जावळे, शिवाजी खाडे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व सेवक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. अशी माहिती प्रा. अनिल पडवळ यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे