गुरुवर्य ए.गो.देव प्रशालेचा इयत्ता १०वी चा निकाल १०० टक्के
1 min read
बेल्हे दि.२७:- इयत्ता १०वी बोर्ड परीक्षेत बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेचा निकाल १००% लागला असल्याची अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक एस.सी.पटेल यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दि.१ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता १०वी बोर्ड परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दि.२७ मे २०२४ रोजी मंडळाकडून जाहीर करण्यात आला.मार्च २०२४ परीक्षेस प्रशालेचे २८ विद्यार्थी बसले होते, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल १०० % लागला आहे. विशेष प्राविण्यासह- ९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत- १० विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत- ७ विद्यार्थी, तृतीय श्रेणीत- २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतील पाहिले पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-
गौरी विलास बांगर – ९०.२० %, तेजल सुधीर बेल्हेकर – ८९.६०%, स्नेहा संजय बेल्हेकर – ८६.२०% , पाटाडे माया महेंद्र – ८४.८०%, सृष्टी नंदकुमार चिंचवडे – ८४.००% वरीलप्रमाणे गुण मिळवून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व प्रशालेचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे, सर्वोनती मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे,सचिव नरहरी शिंदे,उपाध्यक्ष लक्ष्मण काळे,गावचे सरपंच कल्पना काळे, उपसरपंच महेश काळे व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.