विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल साकोरी विद्यालयाची सलग ११ वर्षे १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

1 min read

साकोरी दि.२७:- विद्यानिकेतन विद्यालयाचा सन-२०२३-२४ निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्या सुनीता शेगर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. असून विद्यालयातील कुमार आर्यन रमेश पोहकर याने ९१.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तसेच कुमारी सोनाली बाळू खोमणे ८९.२० टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आणि कुमारी भक्ती संतोष गाडगे हिने ८६.८० मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले मार्क प्राप्त करून विद्यानिकेतनच्या हिरेजडीत मुकुटात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले.या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सुरेश साबळे, शेवाळे रमेश, घुले कैलास, टाव्हरे वर्षा, गवारी अश्विनी, भालेराव योगेश, पाडेकर छाया, सातपुते सुजाता, शेवाळे प्रियंका, जाधव र्ऋतुजा, पवार रविंद्र , बारवे अतुल, काळे धनंजय यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, पालकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष पांडुरंग मनाजी साळवे तसेच प्राचार्या, सुनीता शेगर यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे