पोलिसांकडून कारवाईचा धडाका; अग्रवाल बिल्डर ला संभाजीनगर येथून अटक; पब मालक, मॅनेजर सह सात जण ताब्यात

1 min read

पुणे दि.२२:- पुणे पोलिसांनी पहिल्या दिवशी कामात दिरंगाई केली असली तरी मागील 24 तासात गवान कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून उद्योजक विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले.

तसेच वेदांत अग्रवाल याने ज्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले होते आणि तो ज्या पबमध्ये गेला होता, तेथील मालक, मॅनेजर आणि बार टेंडरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.

पुण्यातअल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. त्यांनतर 15 तासातच आरोपीला जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असला तरी त्याला एवढ्या लवकर जामीन कसा मिळाला? पुणे पोलिसांवर कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव होता का? असे म्हणून विरोधकांनी टीकेची झोड उडवली होती.

पुणे अपघाताचे प्रकरण तापल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले. यानंतर आता या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी देखील पुण्याच्या पोलिस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

पालकमंत्री अजित पवार यांचा पुणे पोलिस आयुक्तांशी फोनवर संवाद साधला आहे. ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह केसमध्ये राजकीय हस्तक्षेप न करता योग्य कायदेशीर निर्णय घ्यावा, असे आदेश अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे अग्रवाल बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केलाय. विशाल अग्रवाल आणि सुनील टिंगरे यांचे व्यावसायिक संबंध होते.

त्यामुळंच आमदार सुनील टिंगरे मध्यरात्री पोलीस ठाण्यात बसून होते असा दावा विनिता देशमुख यांनी केला होता. विनिता देशमुख यांच्या आरोपानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देखील दिले होते. सुनील टिंगरे म्हणाले होते की, माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती पहाटे 3 च्या सुमारास कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली.

तसंच माझे परिचित विशाल अगरवाल यांनीही फोन केला. अगरवाल यांनी त्यांच्या मुलाचा अॅक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो.

पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे