वनकर्मचाऱ्यांना धमकावणे पडले महागात : ८ ते ९ जणांवर गुन्हा दाखल

1 min read

आळेफाटा दि २०:- पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील गाजर पट येथे १० मे रोजी शिवारात नानूबाई कडाळे यांचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती.

त्या वेळी आक्रोश निर्माण होऊन नातेवाईकांना न विचारताच कोणतीही माहिती न घेता जमलेल्या काही लोकांनी वन कर्मचारी यांना भलतेच धारेवर धरले होते. एका राजकीय पुढाऱ्याने तर वन अधिकारी, कर्मचारी आणि एका पोलीस अधिकारी यांना अत्यंत उर्मट भाषा वापरली होती.

त्याच वेळी जमावातील काही लोकांनी महिला वनकर्मचारी यांना धक्का बुक्कीला सुरुवात केली असता त्या मध्ये सुवर्णा हनुमंत खुटेकर या वनमहिला वनकर्मचारी यांचा जमावातील काही लोकांनी गळा दाबल्याची घटना घडली होती.

त्या गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी पिंपळवंडी येथील एका खाजगी रुग्णालयात त्या नंतर प्रकृती खालावल्यामुळे मंचर ग्रामीण रुग्णालय तदनंतर पुणे येथील रुग्णालयात उपचारकामी दाखल करण्यात आले होते. तसेच जमावापैकी एका इसमाने धारदार शस्त्राने दहशत निर्माण केली असल्याने परिणामी ओतूर पोलिसांत अश्विनी देविदास

राऊत यांच्या फिर्यादीवरून विविध कलमां नुसार अंकुश तोतरे, मनोहर गाजरे, मुकुंद उर्फ भाऊ रामचंद्र कुटे, अक्षय कुटे, अश्विनी गोविंद शिंगोटे, विजय कानेकर आणी इतर दोन ते तीन ओळख नसलेल्यांवर इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली

असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर हे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे