तांबेवाडीत भर दुपारी दोन घरांत चोरी; साडेचार लाख रुपयांचे दागिने व रोकड लंपास; जुन्नर तालुक्यात दिवसा चोऱ्यांचे प्रमाण वाढले

1 min read

Oplus_131072

बेल्हे दि.१९:- तांबेवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी दुपारी १ वाजता दोन बंद घराचे कुलूप तोडुन साडेपाच तोळे सोन्याचे दागीने व‌ ४० हजार रुपयांची रोख रक्कम गेली चोरीला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तांबेवाडी या ठिकाणी रहात असलेले ज्ञानेश्वर गणपत तांबे (वय – ५४) हे रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरापाठीमागे असलेल्या शेतावर काम करण्यासाठी जात असताना सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावुन गेले होते

त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर ते आतमध्ये गेल्यानंतर पाहीले असता कपाटाचा दरवाजा तोडुन आतील लॉकर तोडलेले दिसले व त्यामध्ये असलेले चार तोळे चे सोन्याचे मंगळसूत्र, १ तोळ्यांचे सोन्याचे कानातले व इतर सोन्याचे दागिने व ४० हजार रूपयांची रोख असा

एकूण ४ लाख २३ हजार रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. दरम्यान तांबे घराबाहेर आले असता बाजुलाच रहात असलेल्या उषा विलास तांबे यांच्याही बंद घराचा दरवाजाचे कुलूप चोरटयांनी तोडलेले दिसले त्यांच्या घरातील अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २२ हजार रोख रक्कम चोरून त्यांनी ठिकाणाहुन पळ काढला.

अशी फिर्याद ज्ञानेश्वर गणपत तांबे यांनी दिली आहे. याबाबतची माहिती लगेच आळेफाटा पोलीस स्टेशनला कळवली असता घटनास्थळी पोलीसांनी भेट देऊन पहाणी करून पंचनामा केला आहे.

पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगार यांच्या मार्गदर्शनासाठी पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे