३ लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले; ससून रुग्णालयात धक्कादायक प्रकार; तीन डॉक्टरांना अटक; कल्याणीनगर अपघात प्रकरण
1 min read
पुणे दि.२७:- पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणात रोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. ससून हॉस्पिटलमधील सकाळी दोघांना अटक करण्यात आली होती तर याप्रकरणात आणखी एकाला दुपारी अटक करण्यात आलेली आहे. अतुल घटकांबळे नावाच्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे पुरवल्याची माहिती आहे.त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ससूनमधील फॉरेन्सिक २ डॉक्टरांना देखील अटक केलेली आहे. या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
3 लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणीनगर अपघाताप्रकरणी ससूनच्या तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार ब्लडचा रिपोर्ट बदलला असल्याचं समोर आलं आहे. अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे ब्लड गोळा करण्यात आले होते, ते दुसऱ्या व्यक्तीचे होते. तेच ब्लड फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते.
आरोपीचे ब्लड सॅम्पल ससूनच्या डॉक्टरांनी घेऊन ते डस्टबीनमध्ये फेकले. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून तेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले, असा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे.
श्रीहरी हरलोर यांनी ब्लड सॅम्पल घेतले आणि रिप्लेस केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. अजय तावरे याला देखील अटक करण्यात आली होती. तावरे याच्या आदेशानेच हरलोर याने काम केले आहे. आम्हाला शंका असल्याने आरोपीचे ब्लड सॅम्पल आम्ही औंधच्या हॉस्पिटलला देखील पाठवले होते, असं आयुक्त कुमार म्हणाले.