नळवणे कुलस्वामी खंडेराय देवस्थानच्या भाविकांसाठी पंकज कणसे यांनी पुरवले मोफत पाण्याचे टँकर
1 min read
आणे दि.१९:- आणे पठारावरील श्रीक्षेत्र नळवणे (ता.जुन्नर) येथील श्री कुलस्वामी खंडेरायाचे मंदिर असून येथे महाराष्ट्रातून असंख्य भाविक श्री च्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची टंचाई सर्वत्र असल्याने श्री च्या गडावर येणाऱ्या भाविकांसाठी देखील तीव्र पाणी टंचाई भासत आहे.
श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थानने दानशूर व्यक्तिमत्त्व राजुरी उंचखडक गावचे पंकज कणसे यांना पाण्याचे टँकर साठी विनंती केली असता त्वरीत पंकज सोपान कणसे युवा प्रतिष्ठान यांनी रविवार दि.१९ पाण्याचा टँकर पाठवून भाविकांची होणारी गैरसोय दूर केली.
टँकर मधील पाणी देवस्थानला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडले आहे. अजूनही आवश्यकता भासल्यास भाविकांना पाणी पुरवण्यात येईल असे आश्वासन दिले. दानशूर व्यक्तिमत्त्व पंकज कणसे यांचे देवस्थान व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
आणे पठारावर भीषण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वन्यप्राणी तसेच पाळीव प्राणी, नागरीक यांची पाण्याची मोठी समस्या या ठिकाणी आहे. गेल्या महिनाभरापासून पंकज कणसे हे पठारावर विविध गावांमध्ये व वाडी, वस्ती वरती २५ हजार लिटर क्षमता असलेले पाण्याचे टँकर गेल्या महिनाभरा पासून मोफत पुरवण्याचे काम करत आहेत.
त्यांच्या या सामाजिक कार्याला पठारावरील नागरिकांनी सलाम केला आहे. आणे पठारावरील आणे, पेमदरा, नळवणे, शिंदेवाडी या भागात भीषण पाण्याची टंचाई सध्या जाणवत आहे. पाण्याप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचा देखील येथे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.