अनाथ – निराधार मुलांना मिळाले आंबा रसाचे गोड जेवण
1 min read
घोडेगाव दि.१८:- पळसठिका, घोडेगाव येथील अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष विलास बंधारे यांचा वाढदिवस व प्रा सुरेखा आणि प्रा अनिल नारायण निघोट यांची मुलगी डॉ सोनल व डॉ राहुल नरवडे आणि मुलगा शैलेश व आकांक्षा लाड यांच्या नुकत्याच पार पडलेल्या.
शुभविवाहानिमित्त अनाथ निराधार मुलांना आंबारसाचे गोड जेवण देऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रा सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा अनिल निघोट
मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव यांनी आपल्या आनंदात मुलांना व त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या विलास पंधारे यांच्या वाढदिवशी सर्वांना गोड जेवण देऊन सहभागी केले.
यावेळी संचालिका वैशाली पंधारे व संस्थापक विलास पंधारे यांनी प्रा सुरेखा निघोट व प्रा अनिल निघोट सर यांचे सतत मार्गदर्शन व मदत व प्रोत्साहन असते व सामाजिक जाणीवेतुन बालकांना गोड जेवण देऊन सामाजकार्याचा आदर्श घालून दिल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त आंबेगाव भुषण पुरस्कारासह सत्कारही केल्याबद्दल आभार मानले.