विशाल जुन्नर पतपेढीच्या वतीने कै.जनार्दन बांगर यांच्या स्मृतीदिनानिमित्त बेल्ह्यात भव्य आरोग्य शिबीर
1 min read
बेल्हे दि.१९:- विशाल जुन्नर सहकारी पतपेढीचे संस्थापक, संचालक कै.जनार्दन रभाजी बांगर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त बेल्हे (ता.जुन्नर) येथील स्वामीकृपा लाॅन्स येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सकाळी ९ वाजता प्रतिमापूजन ९.३० ते ११.३० ह.भ.प.तुळशिराम महाराज सरकटे यांचे हरी किर्तन व त्यानंतर आरोग्यशिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कै.जनार्दन बांगर यांच्या आठवणींना उजाळा देत बेल्हे ग्रामस्थ व विशाल जुन्नर सहकारी पतपेढीच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली तर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई, दिपज्योत मेडिकल फाउंडेशन (महा.राज्य), रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी पुणेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत.
शिवनेरी हाॅस्पिटल, आनंद हाॅस्पिटल, डॉ.डि.वाय.पाटील मेडीकल कॉलेज व हाॅस्पिटल पिंपरी, पुणे, यांच्या माध्यमातून ह्रदयरोग तपासणी, हाडांचे आजार व तपासणी, महिलांचे आजार, डोळ्यांच्या तपासण्या व चष्म्याचे नंबर, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, रक्तदाब तसेच महिलांसाठी पॅप स्मिअर (गर्भाशयाचा कॅन्सर तपासणी).
मॅमोग्राफी स्क्रिनिंग (स्तनांचा कर्करोग) इत्यादी महागड्या तपासण्या व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जवळजवळ २५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. विशाल जुन्नर सहकारी पतपेढीचे सर्व संचालक,अधिकारी व कर्मचारी, दिपज्योत मेडिकल फाउंडेशनचे पदाअधिकारी.
तसेच रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे मेडिकल डायरेक्टर प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ रो. डॉ.योगेश गाडेकर,रो.गणेश काशिद,रो.सुनिल पाटे पाटील, डॉ.डि.वाय.पाटील रुग्णालयाचे मेडिकल आॅफिसर डॉ.अजयकुमार साहू व त्यांच्या वैद्यकीय टिमचे स्वागत संस्थेच्या वतीने संचालक भास्कर गाडगे यांनी केले.
तर विशाल जुन्नर सहकारी पतपेढीचे उपाध्यक्ष अरुण पारखे, संजय गोसावी, लक्ष्मण कोरडे, धोंडिभाऊ बांगर, वसंत लोहोटे, सुप्रिया मेटांगळे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी महादू मेटांगळे यांच्या हस्ते तज्ञ स्पेशालिस्ट डाॅक्टर्स, आरोग्यसेवक, लॅब टेक्निशियन.
फार्मासिस्ट यांचा सन्मान करण्यात आला. व रोटरी डॉ.योगेश गाडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना शिबीराविषयी माहिती दिली. तर प्रविण बांगर व धोंडिभाऊ बांगर यांनी आभार मानले.