विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

1 min read

पंढरपूर दि.१९:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पूर्ण होत आले आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. पासध्या रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत देवाचे लांबून दर्शन सुरू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रापूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीच्या बैठकीचे आज (शनिवारी) आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अॅड. माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे