बांगरवाडीच्या मोरांना रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचा मदतीचा हात

1 min read

बेल्हे दि.१७:- बांगरवाडी ता. जुन्नर गावात २५० ते ३०० मोर असल्याने दुष्काळाचे सावट पाहता या मोरांना खाद्य व पाण्याची टंचाई जाणवत होती. ही गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलच्या वतीने २०० किलो मका या मोरांसाठी देण्यात आले तसेच पाण्याचा टँकरही देण्यात आला.

तसेच राजुरी गावचे बबन हाडवळे यांनी या मोरांसाठी १०० किलो गहू व पाण्याचे ब्यालर पुरवले. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वन्य प्राण्यांना व मोरांचा चारा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मोरांना मदतीचा हात मिळाल्यामुळे तात्पुरता खाद्य व पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ग्रामस्थ व पशु मित्रांनी या ठिकाणी पाणवठे तयार केले असून खाद्य ही आत्तापर्यंत पुरवले आहे.

परंतु हे पानठे व खाद्य दिवसेंदिवस कमी पडत असून मोरांना गहू, ज्वारी,बाजरी,तांदूळ व इतर धान्य दानशूर व्यक्तींनी द्यावे असे आवाहन पक्षी मित्र नारायण सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बांगर यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे