बबन वामन हाडवळे राजुरी गावातील एक प्रखर ध्येयवादी व्यक्तिमत्व

1 min read

राजुरी दि.१७:- मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागात गेली ४१ वर्षे ७ महिने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कार्याची मोहोर उमटविणारे प्रखर ध्येयवादी व्यक्तिमत्व म्हणून जुन्नर तालुक्यातील राजुरी बबन हाडवळे लोकप्रिय आहेत.बबन हाडवळे रावांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या राजुरी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात वामनराव व पार्वतीबाई या दाम्पत्याच्या पोटी ६ डिसेंबर १९६३ रोजी झाला. शालेय शिक्षणानंतर माटुंग्याच्या पोदार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत असतानाच १९८२ मध्ये पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागात त्यांना टॅली कारकूनची संधी चालून आली.त्यांचे पिताश्रीही त्याच खात्यात किनारा कामगार म्हणून नोकरीस होते. या सुवर्णसंधीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. कारकूनाची सेवा बजावत असतांना काही काळ खात्यांतर्गत दूरसंचार विभागात सेवा केली. त्यामुळे जनसंपर्क वाढल्याने सामान्य कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचे नाव परिचयाचे झाले.

आपल्या सेवेचा कार्यकाल सुरू केला. त्यांच्या वडीलांनी दिलेले धार्मिक, सामाजिक संस्कार आजही ते आपल्या जीवनात अंगिकारतांना दिसतात. त्यांच्या मुखी नेहमी पांडुरंगाचे नाव आढळते. त्यांच्या यशस्वी जीवनाचे शिल्पकार म्हणून आपले पूज्य माता-पिता असल्याचे निःसंकोचपणे मान्य करतात. तसेच दोन्ही कामगार नेते हे आपले प्रेरणास्त्रोत असल्याचे मानून तेच आपले दैवत असल्याचे मान्य करतात. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या वडीलांना झालेला अपघात आजही त्यांना अस्वस्थ करतो, सुदैवाने ते त्यातून बचावले. परंतु त्या प्रसंगी अनेकांनी केलेल्या मदतीचे ऋण विसरलेले नाहीत. प्रतिकूल स्थितीतही ते न डगमगता धीराने सामोरे गेले. आजही कामावर आपल्या सहकार्यास एखादी अडचण आल्यास ती सोडवल्या शिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. त्याचा योग्य तो पाठपुरावा करून पूर्तता करण्यात त्यांचा हातखंडा आहे. सहकार क्षेत्रातील साईप्रेरणा पतपेढीचे स्वंस्थापक अध्यक्ष देवीदासदादा डोंगरे. यशवंत नागरी सहकारी पतसंस्थाचे स्वंस्थापक -अध्यक्ष महादेव वाघ, विघ्नहर सह. साखर कारखान्याचे संचालक प्रकाश जाधव, यशोदीप पतसंस्थेचे संचालक आबासाहेब देशमुख व आपले मामा नामदेवबुवा जाधव यांना गुरुवर्य मानून त्यांच्या मार्गदर्शनाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायला बबनराव विसरत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या अंगी अफाट सौजन्यशिलता, शालिनता दिसून येते. एक कुटुव्बवत्सल प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या धाकट्या भावाला विज्ञानशाखेतील विद्यावाचस्पती (PHD) तर मुलांनाही पदवीपर्यंतचे शिक्षण देवून कर्तव्यांची पूर्तता केली आहे. या कामी त्यांच्या सहचारिणी लतावहिनींची मोलाची साथ लाभली आहे. त्यांनी कठीण प्रसंगांतही नंदादीपाच्या तेजस्वीतेची अनुभूती अनुभवली. त्यांनी समाजसेवेची चुणूक दाखवत कामगार संघटना, सहकारी पतपेढी, उपहारगृह, क्रिडासवांस्था आदी माध्यमातून कामगारांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दरम्यान गोदी कामगारांचे नेते सर्वश्री मनोहर कोतवाल, एस्. आर् कुलकर्णी व डॉ. शांति पटेल आदींशी परिचय झाल्याने त्यांच्या कार्याची कामगार संघटना पातळीवर दखल घेण्यात आली. कालांतराने पोर्ट प्रशासनाच्या अधिका-यांनी सुद्धा बबनरावांच्या कार्याची प्रशंसा करून उचित सन्मान केला. नेत्यांनी कौतुकाने पाठीवर थाप मारल्याने त्यांचे कार्य आणखी जोमाने बहरले. हे सर्व घडून आले ते त्यांच्या वाणीतील माधुर्य, प्रामाणिकपणा व कमालीची कर्तव्यनिष्ठा या गुणांमुळे !कामगारांची व्यसनाधिनता कमी व्हावी, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, मारवाडी-पठाणांचे कर्ज न घेता रितसर पतपेढीतून कर्ज घेऊन त्यांची नीट परतफेड व्हावी यासाठी प्रबोधन करणारा हा अवलिया हळूच बचतीचा मार्गाकडे कामगाराला कधी न्यायचा ते कळत नसे. सहकारी पतपेढी, मग ती पोर्ट ट्रस्टची असो वा बाहेरची, सहकारी खरेदी-विक्री केंद्र यांतून सामाजिक प्रबोधन करण्याचा त्यांचा ध्यास मात्र कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकी जपत कामगारांना जास्तीत जास्त बचतीच्या मार्गावर वळवत आवर्त ठेव, मुदत ठेव, भागभांडवल वृद्धी, मेंबर रिटायरमेंट बेनिफिट फंड आदी गुंतवणुकीच्या मार्गाने कामगाराला प्रवृत्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. कर्मचारी राजी झाल्यास त्वरीत अर्जही भरण्यात ते मागे नसत. गरजू कामगारांना, सहकाऱ्यांना,आपण रहात असलेल्या विभागातील लोकांना मदतीचा हात देणे हा तर त्यांचा स्थायीभाव आहे. दाखवत दीपस्तंभाप्रमाणे दिशा दर्शकाचे अवघड काम सोपे केले. परिणामी आपल्या सहचारिणीबध्दल कृतज्ञता व्यक्त करताना कोणताच संकोच करीत नाहीतः कामातही आपल्या सहकाऱ्यांचे सहकार्य मान्य करतानाच वरिष्ठांकडून तसेच अधिकाऱ्यांकडून आपल्या कार्याची पोच पावती मिळाल्याने “कृतार्थ मी, कृतज्ञ मी ” असल्याचे मोठ्या दिलाने मान्य करतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे