तळ्याई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त काढलेली भव्य मिरवणूक

1 min read

बेल्हे दि.१६:- गुळूंचवाडी (ता .जुन्नर) येथील देवकर मळ्यात तळ्याई देवीचा यात्रोत्सव मोठ्या आनंदात संपन्न झाला. तळ्याई मित्र मंडळाच्या वतीने यात्रेनिमित्त विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी सात ते आठ या वेळेत देवीचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर आठ ते नऊ या वेळेत मांडव डहाळे तसेच देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत महिला डोक्यावर कलशपात्र घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या.मिरवणुकीनंतर देवीची आरती व भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली.

सायंकाळी पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत शेरणी वाटप तसेच हरिपाठ आणि आरती घेण्यात आली.रात्री सात ते नऊ या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वरी झाडे आळंदी देवाची यांचे श्रीहरी कीर्तन सेवा झाली. इटकाई भजन मंडळ शिंदेवाडी आणि शैनेश्वर प्रासादिक भजन मंडळ गुळूंचवाडी यांनी कीर्तन सेवेला अप्रतिम कोरस सेवा प्रदान केली.कीर्तन सेवेनंतर शोभेचे दारूकाम करून मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या भाविक भक्तांसाठी श्रीक्षेत्र आणे येथील प्रसिद्ध आमटी भाकरीचा महाप्रसादाचे आयोजन तळ्याई मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.नंतर देवीच्या महाआरतीने यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.तळ्याई मित्रमंडळाचे कार्यकर्ते गंगाराम गुंजाळ, नामदेव आग्रे, ज्ञानेश्वर देवकर, संभाजी देवकर, बाळासाहेब देवकर, निलेश देवकर, सोपान देवकर, दादाभाऊ देवकर, जालिंदर देवकर, मच्छिंद्र देवकर, कारभारी देवकर, गणेश देवकर, सुभाष देवकर यांनी यात्रोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी पुरेपूर सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे