पिंपरी पेंढारच्या बालचमूंनी केली किल्ले शिवनेरीवर स्वच्छता
1 min readपिंपरी पेंढार दि.२०:- पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील कै. लखमीचंद (भाऊशेठ) हिरालाल गांधी यांच्या स्मरणार्थ पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन, माऊली वानप्रस्थ आश्रम पिंपरी पेंढार व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून शिबिरात सहभागी झालेल्या बालचमू शिबिरार्थांनी किल्ले शिवनेरी येथे दर्शन घेवून साफसफाई व स्वच्छता केली अशी माहिती पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशनचे संस्थापक विमलेश गांधी यांनी दिली.
पिंपरी पेंढार येथे बुधवार दिनांक १५ मे पासून हे बालसंस्कार शिबीर सुरु झाले असून या शिबिराचा समारोप मंगळवार दि. २१ मे रोजी होणार आहे असे सांगून या शिबिराविषयी अधिक माहिती देताना विमलेश गांधी म्हणाले, हे शिबीर सहा ते चौदा वयोगटातील मुलाम लींसाठी होत असून या शिबिरामध्ये प्रार्थना, श्लोक पाठांतर, कथा कथन, संत चरित्रे, योगासने ,
प्राणायाम, सूर्यनमस्कार, हरिपाठ पाठांतर, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, समुपदेशन, चित्रकला , रंगभरण, खेळ याबरोबरच या शिबिरार्थांसाठी मान्यवरांच्या व्याख्यानाचे देखील आयोजन केले जात आहे. तसेच दररोज सायंकाळी साडेपाच ते सात या वेळात ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांचे जावू संतांचिये गावा या विषयावर संत चरित्र कथा होत आहे.
बालसंस्कार शिबिराचा उपक्रम यावर्षी प्रथमच घेण्यात आला असून या उपक्रमाला पिंपरी पेंढार बरोबरच परिसरातील बालचमूंनी व त्यांच्या पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे गांधी यांनी सांगितले.