कल्याण- पाथर्डी एसटी व टेम्पोच्या धडकेत पाच जखमी

1 min read

ओतूर दि.३:- कल्याण – नगर महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कल्याणकडून ओतूरच्या दिशेने येणारी विठ्ठलवाडी – कल्याण – पाथर्डी एसटी बस (एमएच १४ बीटी ३९३६) व ओतूर कडून कल्याणच्या दिशेने जाणारा टेंपो (एमएच १२ टीयु ६०५३) यांची धडक झाली. अपघातानंतर टेम्पो उलटला. सदर अपघात गुरुवारी (दि.२) रात्री साडे आठच्या दरम्यान घडला. या अपघातात टेंपोचालक अरुण बाबुराव सर्से (रा. टामकर वाडी, टाकळी हाजी), भाऊसाहेब करकुंबे, अमन अरुण सर्से, मोनिका अरुण सर्से, माई अरुण सर्से हे जखमी झाले. जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली.घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, पोलिस मित्र अमोल मडके, गोरक्षनाथ गवारी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन ओतूर पोलिसां कडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे