ऊसतोडणी चालू असताना बिबट्याचा हल्ला; जुन्नर तालुक्यातील घटना

1 min read

पिंपळवंडी दि.२४:- जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या ठिकाणी एका १६ वर्षीय ऊसतोड काम करणाऱ्या मुलीवर बिबटयाने हल्ला करून केले जखमी केल्याची घटना मंगळवार दि.२३ रोजी सायंकाळी घडली.

गावातील तोतर बेट मळ्यात रहात असलेले सुर्यकांत सखाराम तोतरे यांच्या शेतात ऊस मंगळवारी तोडणी चालु असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रितु शामराव गागुर्डे (वय १६) वर्षीय या ऊसतोड महिला कामगारावर बिबट्याने अचाणक पणे येऊन हल्ला केला.

बाजुला असलेल्या ऊसतोड कामगारांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला परंतु या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात मुलीच्या पाठीवर व डोक्यावर जखम झाली असुन सदर मुलीला नारायणगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी वन विभागाचे वैभव काकडे, संतोष साळुंखे, बी.के.खरगे, रोशन नवले यांनी भेट दिली असुन या ठिकाणची ऊस तोडणी तातपुरती थांबविण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे