जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्यात चिमुरडीचा मृत्यू 

1 min read

जुन्नर दि.११:- जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे बिबट्याच्या हल्यात मेंढपाळ यांच्या संस्कृती संजय कोळेकर दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि.११ पहाटेच्या सुमारास घडली आहे.

याविषयी मिळालेली माहिती अशी की, संपत मोरे यांच्या शेतावर संजय कोळेकर या धनगरचा वाडा मुक्कामी होता. रात्री जेवण झाल्यावर सगळे कुटुंब त्याच शेतात झोपले होते.

गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आईच्या शेजारी गोधडीत झोपी गेलेल्या संस्कृतीला बिबट्याने अलगद उचलून बाजूच्या अर्धा किलोमिटर अंतरावरील उसाच्या शेतात फरफटत नेले व ठार केले.

दरम्यान सकाळी एका उसाच्या शेतात त्या चिमुरडीचा बिबट्याने खाल्लेला अर्धवट मूतदेह सापडला.

घटनेची माहिती कळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जाणार आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जर बिबट्यांचा बंदोबस्त करणार नसेल तर शेतकरी स्वतः कायदा हातात घेऊन बिबट्याचा चोख बंदोबस्त करतील, अशी संतप्त प्रतिक्रिया शिरोली खुर्द येथील शेतकरी वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शासन व वन विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे