अहिल्यानगरच्या उड्डाणपुलावर १५ दिवसांत ३ अपघात; मक्याच्या गोण्या घेऊन चाललेला ट्रक पलटला
1 min read
अहिल्यानगर दि.३:- अहिल्यानगरच्या उड्डाणपुलावर बुधवार दि .३ सकाळी सात वाजून १० मिनिटांनी अपघात झाला. मक्याच्या गोण्या घेऊन चाललेला ट्रक पलटला. ट्रकमधील गोण्या उड्डाणपुलावरून खाली पडल्या. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा ट्रक जालन्यावरून शिक्रापूरच्या दिशेने चालला होता. ट्रकमध्ये गोण्या जास्त होत्या. उड्डाणपुलावरील वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला. ट्रकमधील काही गोण्यात उड्डाणपुलावरून विक्रीकर भवनच्या बाजूने खाली रस्त्यावर पडल्या. मागील १५ दिवसांत उड्डाणपुलावर अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे.